पडुन आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे?
एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे?
अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या
अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे?
सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू?
नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का,
’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’
उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा
तू बिचार्या वाचकांना एवढा छळलास का रे?
-- स्वामी संकेतानंद
काव्यरस
वाचने
5215
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
=))
जबरा रे स्वाम्या.
जबरा रे स्वाम्या.
रच्याकने माझ्याकडे मराठी "अॅटलास श्रग्ड" पडून आहे. कुणाला वाचावयाचे असल्यास परत करण्याच्या बोलीवर देऊ शकेन.
राजेहो..
In reply to जबरा रे स्वाम्या. by सतिश गावडे
तुहं 'सात सक्कं त्रेचाळीस' म्या अजुनही वापिस केलो नाही. तवा दोन्ही एकाच येरी वापिस कराच्या बोलीवर घेऊन जातो... का मन्तस? ;)
असं नाही चालायचं गडया. ते
In reply to राजेहो.. by स्वामी संकेतानंद
असं नाही चालायचं गडया. ते पुस्तक दयायचं आणि दुसरं पुस्तक न्यायचं. हा फंडा मी पुस्तक देताना सगळ्यांच्याच बाबतीत वापरतो.
हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो कारण त्याला माझ्याकडील दुसरे पुस्तक न्यायचे असते. :)
हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक
In reply to असं नाही चालायचं गडया. ते by सतिश गावडे
हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो...म्हणजे तुम्ही फक्त वेताळ वेग्रेंना पुस्तके देता होय. ठीकाय, मग मी नाही येणार ;)
काका, थोडक्यात काय तर
In reply to हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक by डॉ सुहास म्हात्रे
काका, थोडक्यात काय तर तुमच्यातल्या डॉक्टर अधून मधून डोकावतो. :)
उच्च.
हा हा हा =)) एकच नंबर =))
ह्याची सर नाही आली.
ह्याची सर नाही आली.
विडंबन चांगलं जमलंय.
विडंबन चांगलं जमलंय.
पण आपल्या भारतीय विचारवंतांना विसरलात याबद्दल निषेध! :-)
ते विषयांतर झालं असतं...
In reply to विडंबन चांगलं जमलंय. by आतिवास
ते विषयांतर झालं असतं... :)
(No subject)
=))
जबरा जमलय !
जबरा जमलय ! :)
पण, तिकडे पाऊस पडला की इकडे छत्री उघडणार्या भार्तिय इचारवंतांना इसार्ल्याबद्दल दण्कून णीशेद ;)
त्यांचा सत्कार वेगळ्या
In reply to जबरा जमलय ! by डॉ सुहास म्हात्रे
त्यांचा सत्कार वेगळ्या धाग्यावर केला जाईल.. ;)
हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही
In reply to त्यांचा सत्कार वेगळ्या by स्वामी संकेतानंद
हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही यथावकाश आठवण करून देऊच!
डन!
In reply to हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही by बॅटमॅन
डन!
हाहाहाहा!
जबरदस्त! या सगळ्या बुकांचे रद्दी म्हणून किती पैशे येतील स्वाम्या?
माझा तरी वर्षाचा खर्च निघेल
In reply to हाहाहाहा! by पैसा
माझा तरी वर्षाचा खर्च निघेल ब्वा !
मस्तच
:)
हा हा, भारी!
हा हा, भारी!
स्वामिज्ज्जीईईईईईईईईईईईईईईईईई
स्वामिज्ज्जीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
@बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का,
विडंबन आवडलं.
विडंबन आवडलं.
चांगला
विडंबन आवडलं. एक चांगला प्रयत्न. काही शब्द मात्र गेयतेच्या आड येतात.
सार्त्र विषयी तुमचं विडंबना व्यतिरीक्त काय मत आहे ?
स्वामीजी
सार्त्र विषयी तुमचं विडंबन बाह्य मत काय आहे
जाणुन घ्यायला आवडेल
तुम्ही त्याच्या विचारांविषयी काय विचार करता ?
विडंबना ची झकास भट्टी जमलेली आहे हे वेगळ सांगायला नको
नक्कीच
In reply to सार्त्र विषयी तुमचं विडंबना व्यतिरीक्त काय मत आहे ? by मारवा
दोनतीन महिन्यांनी कळवेन माझे मत. सार्त्रविषयी सविस्तर लिहायला हरकत नाही.