✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(पडुन आहे सार्त्र अजुनी)

स — स्वामी संकेतानंद, Fri, 11/14/2014 - 12:54
पडुन आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे? एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे? अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे? सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू? नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, ’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’ उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा तू बिचार्‍या वाचकांना एवढा छळलास का रे? -- स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया द्या
5152 वाचन

💬 प्रतिसाद (24)

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 11/14/2014 - 12:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments

जबरा रे स्वाम्या.

सतिश गावडे
Fri, 11/14/2014 - 12:59 नवीन
जबरा रे स्वाम्या. रच्याकने माझ्याकडे मराठी "अ‍ॅटलास श्रग्ड" पडून आहे. कुणाला वाचावयाचे असल्यास परत करण्याच्या बोलीवर देऊ शकेन.
  • Log in or register to post comments

राजेहो..

स्वामी संकेतानंद
Fri, 11/14/2014 - 13:13 नवीन
तुहं 'सात सक्कं त्रेचाळीस' म्या अजुनही वापिस केलो नाही. तवा दोन्ही एकाच येरी वापिस कराच्या बोलीवर घेऊन जातो... का मन्तस? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

असं नाही चालायचं गडया. ते

सतिश गावडे
Fri, 11/14/2014 - 13:25 नवीन
असं नाही चालायचं गडया. ते पुस्तक दयायचं आणि दुसरं पुस्तक न्यायचं. हा फंडा मी पुस्तक देताना सगळ्यांच्याच बाबतीत वापरतो. हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो कारण त्याला माझ्याकडील दुसरे पुस्तक न्यायचे असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/14/2014 - 13:32 नवीन
हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो... म्हणजे तुम्ही फक्त वेताळ वेग्रेंना पुस्तके देता होय. ठीकाय, मग मी नाही येणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

काका, थोडक्यात काय तर

सतिश गावडे
Fri, 11/14/2014 - 13:41 नवीन
काका, थोडक्यात काय तर तुमच्यातल्या डॉक्टर अधून मधून डोकावतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

उच्च.

बॅटमॅन
Fri, 11/14/2014 - 13:02 नवीन
हा हा हा =)) एकच नंबर =))
  • Log in or register to post comments

ह्याची सर नाही आली.

सूड
Fri, 11/14/2014 - 13:04 नवीन
ह्याची सर नाही आली.
  • Log in or register to post comments

विडंबन चांगलं जमलंय.

आतिवास
Fri, 11/14/2014 - 13:04 नवीन
विडंबन चांगलं जमलंय. पण आपल्या भारतीय विचारवंतांना विसरलात याबद्दल निषेध! :-)
  • Log in or register to post comments

ते विषयांतर झालं असतं...

स्वामी संकेतानंद
Fri, 11/14/2014 - 13:14 नवीन
ते विषयांतर झालं असतं... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

(No subject)

जेपी
Fri, 11/14/2014 - 13:07 नवीन
=))
  • Log in or register to post comments

जबरा जमलय !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/14/2014 - 13:20 नवीन
जबरा जमलय ! :) पण, तिकडे पाऊस पडला की इकडे छत्री उघडणार्‍या भार्तिय इचारवंतांना इसार्ल्याबद्दल दण्कून णीशेद ;)
  • Log in or register to post comments

त्यांचा सत्कार वेगळ्या

स्वामी संकेतानंद
Fri, 11/14/2014 - 14:12 नवीन
त्यांचा सत्कार वेगळ्या धाग्यावर केला जाईल.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही

बॅटमॅन
Fri, 11/14/2014 - 14:17 नवीन
हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही यथावकाश आठवण करून देऊच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

डन!

स्वामी संकेतानंद
Fri, 11/14/2014 - 14:45 नवीन
डन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हाहाहाहा!

पैसा
Fri, 11/14/2014 - 13:22 नवीन
जबरदस्त! या सगळ्या बुकांचे रद्दी म्हणून किती पैशे येतील स्वाम्या?
  • Log in or register to post comments

माझा तरी वर्षाचा खर्च निघेल

स्वामी संकेतानंद
Fri, 11/14/2014 - 14:09 नवीन
माझा तरी वर्षाचा खर्च निघेल ब्वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्तच

सविता००१
Fri, 11/14/2014 - 13:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments

हा हा, भारी!

अनुप ढेरे
Fri, 11/14/2014 - 14:35 नवीन
हा हा, भारी!
  • Log in or register to post comments

स्वामिज्ज्जीईईईईईईईईईईईईईईईईई

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/14/2014 - 15:13 नवीन
स्वामिज्ज्जीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई Image removed. @बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, Image removed.
  • Log in or register to post comments

विडंबन आवडलं.

राजेश घासकडवी
Sat, 11/15/2014 - 08:58 नवीन
विडंबन आवडलं.
  • Log in or register to post comments

चांगला

तिमा
Sat, 11/15/2014 - 10:30 नवीन
विडंबन आवडलं. एक चांगला प्रयत्न. काही शब्द मात्र गेयतेच्या आड येतात.
  • Log in or register to post comments

सार्त्र विषयी तुमचं विडंबना व्यतिरीक्त काय मत आहे ?

मारवा
Sat, 11/15/2014 - 21:52 नवीन
स्वामीजी सार्त्र विषयी तुमचं विडंबन बाह्य मत काय आहे जाणुन घ्यायला आवडेल तुम्ही त्याच्या विचारांविषयी काय विचार करता ? विडंबना ची झकास भट्टी जमलेली आहे हे वेगळ सांगायला नको
  • Log in or register to post comments

नक्कीच

स्वामी संकेतानंद
Mon, 11/17/2014 - 10:11 नवीन
दोनतीन महिन्यांनी कळवेन माझे मत. सार्त्रविषयी सविस्तर लिहायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा