Skip to main content

दूरदेशी...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी बुधवार, 30/07/2008 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेलो जरी तुला मी सोडून दूरदेशी येइन धावुनी मी जेव्हा तु साद देशी डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा असशील तु उदास, वा खिन्न तू मनात मी ही तिथे असेन तुझियाच आठवात स्मरशील तू मला अन येइल मन भरोनी तेव्हा तुलाच सखये पाहीन मी ही स्वप्नी असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4010
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

क्या बात है" मस्तच " -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

कविता खुप छान आहे... आवडली असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी ... हे खुप आवडले

फुलवा, भावपूर्ण कविता आहे. 'तू लांब दूर तेथे, हूरहूर मात्र येथे' या जुन्यातल्या भावगीताची आठवण झाली.

काय सुंदर लिहिली आहे कविता...सगळ्याच ओळी सुंदर. डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा या जास्ती आवडल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

>> डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा >> माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा खूपच सुरेख लिहिलं आहेस :)

कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू

(रविकिरण मंडळातल्या एखाद्या कवीची असावी असे भासले!) चतुरंग

फुलवा, कविता छानच आहे...

फारच सुंदर कविता.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

एक नम्बर कविता... भरून आल हो एकदम (हे उपरोधाने बोलने नव्हे. ) !!!! :''( पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!