Skip to main content

तुझे नि माझे मिटू दे अंतर

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 29/07/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
दहनाभुमिवर फुले वहाया येशील ना तू माझ्या नंतर मधले सारे विरून जाऊ दे मिटून जाऊ दे आपुले अंतर अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन अश्रु तुझे ते प्रेम बोलतील पुन्हा स्मृतींचे मेघ दाटतील वेळ निघुनी असेल गेला पाचोळ्यावर पाउस ओला उगीच आपुल्या हट्टापायी हरवून बसलो जे काही क्षण पुन्हा परतुनी नाही यायचे किती बोलावा करा निमंत्रण हिशोब कसला झाले गेले आठवणींचे काहूर उरले रंग उडुनी गेला आता दोनच अश्रु जाता जाता असेच ना हे नेहमी होते वेळ जातो अन ओढ लागते तुटण्या आधी रेशीम धागे एकच पाउल येऊ मागे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2603
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

.... उगीच आपुल्या हट्टापायी हरवून बसलो जे काही क्षण पुन्हा परतुनी नाही यायचे किती बोलावा करा निमंत्रण .... हे भान सहजगत्या आधी आलं तर किती बरं होइल नाहि?

खुप छान कविता अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन ....सुंदर

अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन सहीच रे पुष्कराज लगे रहो.. पुण्याचे पेशवे

"असेच ना हे नेहमी होते वेळ जातो अन ओढ लागते तुटण्या आधी रेशीम धागे एकच पाउल येऊ माग"" कविता अतिशय आवडली. चटका लावणारी भावकविता !