Skip to main content

मिठीत तुझ्या असताना...

लेखक जेनी... यांनी सोमवार, 05/05/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिठीत तुझ्या असताना... ओठातल्या ओठात हसताना.. पापण्यांची होते फडफड श्वास श्वासांवर झेलताना... धुंद मी..बेधुंद तु असताना.. रती मी..मदन तु होताना... शहारतो श्वास माझा... ओठांशी ओठ बिलगताना... मोकळ्या केसातुन फिरताना... बटा गालावरच्या आवरताना... हळुच चोरली नजर मी चोळीची गाठ सुट्ताना.... ती नजर झेलताना.. तो श्वास पेलताना.. रोमांच उभे पाठीवर बोटांनी नाव कोरताना मज मी विसरुन जाते... क्षण भरभरुन जगते... सावली तुझी पांघरुन डोळ्यातली लाज लपवते... हा ऋतु रोज यावा.. हा स्पर्श रोज व्हावा.. सहवास मला तुझा असा रोज रोज घडावा... रोज रोज घडावा.....!!!
लेखनविषय:

वाचने 18646
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

हॅ हॅ हॅ (इथे एक निर्बल आणि लाचार माणसाचे केविलवाणे, लाळाघोटे,लोचट, निर्लज्य, ओशट हास्य कल्पावे.)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तु माहेराला जावे... फोनही तुझा न यावा... एकांत मला असा हा... केव्हातरी (तरी) मिळावा... केव्हाततरी(तरी) मिळावा...!!! तोडलस मित्रा ! *yahoo*

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुरुजी तरी सुध्दा फुलांच्या पायघड्या घालायला आणि त्याच्या पुढच्या सजावटी साठी ही आम्हाला बोलवायला विसरु नका.

In reply to by प्यारे१

हे चीटिंग आहे राव!! प्यारेकाका, तुम्ही स्वघोषित आध्यात्मिक कीर्तनकार* असलात तरी आम्ही तुमचा जयजयकार केलाय का कधी ?? चीटिंग नाय हा करायचं !! =)))) *भगव्या रंगात आपल्या सोयीने पाणी घालून डायल्यूट वैगरे करुन घेणे.

कसली भारी विडबने आहेत एकेक, कविताचा धागा बघून हि आपली आवड नाही म्हणत घुसलो नव्हतो इथे.. सही.. लगे रहो..