मिठीत तुझ्या असताना...
ओठातल्या ओठात हसताना..
पापण्यांची होते फडफड
श्वास श्वासांवर झेलताना...
धुंद मी..बेधुंद तु असताना..
रती मी..मदन तु होताना...
शहारतो श्वास माझा...
ओठांशी ओठ बिलगताना...
मोकळ्या केसातुन फिरताना...
बटा गालावरच्या आवरताना...
हळुच चोरली नजर मी
चोळीची गाठ सुट्ताना....
ती नजर झेलताना..
तो श्वास पेलताना..
रोमांच उभे पाठीवर
बोटांनी नाव कोरताना
मज मी विसरुन जाते...
क्षण भरभरुन जगते...
सावली तुझी पांघरुन
डोळ्यातली लाज लपवते...
हा ऋतु रोज यावा..
हा स्पर्श रोज व्हावा..
सहवास मला तुझा
असा रोज रोज घडावा...
रोज रोज घडावा.....!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
18646
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
In reply to मुठीत तुझ्या असताना... by ज्ञानोबाचे पैजार
पैसा ताई
In reply to =)) by पैसा
जियो...
In reply to मुठीत तुझ्या असताना... by ज्ञानोबाचे पैजार
@पैजारबुवा>>> अवडलं बुवा!
In reply to मुठीत तुझ्या असताना... by ज्ञानोबाचे पैजार
गुरुजी तरी सुध्दा फुलांच्या
In reply to @पैजारबुवा>>> अवडलं बुवा! by अत्रुप्त आत्मा
मस्तच !! अगदी सगळ्या टिंबं,
In reply to मुठीत तुझ्या असताना... by ज्ञानोबाचे पैजार
आणि हो, बर्याच दिवसांनी
In reply to मुठीत तुझ्या असताना... by ज्ञानोबाचे पैजार
स्वघोषित समीक्षकांचा धि..
In reply to आणि हो, बर्याच दिवसांनी by सूड
हे चीटिंग आहे राव!!
In reply to स्वघोषित समीक्षकांचा धि.. by प्यारे१
अगं सुडके हळू जरा.... पाणी पि
In reply to हे चीटिंग आहे राव!! by सूड
फक्कड
In reply to मुठीत तुझ्या असताना... by ज्ञानोबाचे पैजार
पैजार बुवा!! सुसाट!!
In reply to मुठीत तुझ्या असताना... by ज्ञानोबाचे पैजार
सुंदर कविता.
कसली भारी विडबने आहेत एकेक,
तो शेवटच्या श्वासाचा उल्लेख