पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने
पुन्हा नव्या उलगडती वाटा
पुन्हा नवी अधरांवर लिहिली
नाविन्याची लोभस गाथा
अस्तित्वाचा नवा अर्थ अन्
जगणे सारे नवेच झाले
बुरसटलेले पाश तोडुनी
नवे पाखरू नभी उडाले...
नव्या नव्याची नवलाई ही
व्यापुन घेते सारे जीवन
नव्या नभीची नवीन बिजली
छेदून जाते जुने कृष्ण घन
नव्या सुरांची नवी भुपाळी
नवी सुगंधी पहाट गाते
अधीर राधा पुन्हा नव्याने
श्यामनिळ्याची होऊन जाते!!
© अदिती जोशी
11.6.13
वाचने
2972
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह
परत एकदा जयदेव कवीचे कौतुक
सुरेख
सन्तोश
धन्यवाद
@पुन्हा नवी अधरांवर लिहिली
धन्यवाद
In reply to @पुन्हा नवी अधरांवर लिहिली by अत्रुप्त आत्मा
फारच उत्कट! मस्त!
आवडली.
आपणास माझी कविता आवडली हे वाचून आनंद झाला!!
In reply to आवडली. by इन्दुसुता
आवडली
सुंदर
सुरेख..
सुरेख रचना
सुरेख आणि सुंदर
वा! सुरेख!!
आभार...