पुन्हा नव्याने..
पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने
पुन्हा नव्या उलगडती वाटा
पुन्हा नवी अधरांवर लिहिली
नाविन्याची लोभस गाथा
अस्तित्वाचा नवा अर्थ अन्
जगणे सारे नवेच झाले
बुरसटलेले पाश तोडुनी
नवे पाखरू नभी उडाले...
नव्या नव्याची नवलाई ही
व्यापुन घेते सारे जीवन
नव्या नभीची नवीन बिजली
छेदून जाते जुने कृष्ण घन
नव्या सुरांची नवी भुपाळी
नवी सुगंधी पहाट गाते
अधीर राधा पुन्हा नव्याने
श्यामनिळ्याची होऊन जाते!!
© अदिती जोशी
11.6.13
व्वाह
परत एकदा जयदेव कवीचे कौतुक
सुरेख
सन्तोश
धन्यवाद
@पुन्हा नवी अधरांवर लिहिली
धन्यवाद
फारच उत्कट! मस्त!
आवडली.
आपणास माझी कविता आवडली हे वाचून आनंद झाला!!
आवडली
सुंदर
सुरेख..
सुरेख रचना
सुरेख आणि सुंदर
वा! सुरेख!!
आभार...