........................१.............................
रागवलेली ती, समजूत काढणारा मी
रागवलेला मी, समजूत काढणारी ती
या दोन विरुद्ध गोष्टी आहेत
.
ती रागावली कि
तिची समजूत काढणे सोपे आहे
ते जमते आजकाल मला
पण तिच्यावर रागावून
ती समजूत काढत असतांना
रागावलेलेच राहणे फार अवघड असते
ते अजूनही जमलेले नाही मला
.
कसं असतं ना,
समजूत काढणारा नेहमीच
समजूतदार असतोच असे काही नाही
पण सांगणार कोणाला?
........................२.............................
रागावलेली ती लगेच लक्षात येते
रागावलेला मी तिला कळतोच असे नाही
कां कळूनही वळत नाही?
.
आपल्या माणसावर रागावणे
हा आपला हक्क जरूर आहे
.
पण आपलं माणूस आपल्यावर रागावले आहे
हे कळायला तर हवे ना?
नेमकी इथेच गडबड होते
........................३.............................
रागवायला काही कारण
लागतेच असे नाही
पण
समजूत काढायला
एकच कारण पुरते
.
"ती रागावली आहे"
........................४.............................
बर्याच वेळा माझी समजूत असायची
मी तिची समजूत काढली आहे
.
हो, पण बर्याच वेळा
........................५.............................
मी तिची समजूत काढतो
तेव्हा मी खूप बोलतो
अगदी मनापासून बोलतो
मन लावून ती ऐकते देखिल
.
ती समजूत काढते तेव्हा
फक्त एकदा
मनापासून डोळ्याला डोळा भिडवून
डोळ्यांनीच सग्गळं सांगून टाकते
.
मग मी पत्करतो त्याला म्हणतात,
"संपूर्ण शरणागती"
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(कधीतरी असंच सुचलेलं)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7164
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
भले शाब्बास
जबरदस्त....
मस्तच !
वाह मिका वाह!!!!!!!!!! सुरेख
छान
सुरेख.
'गोड' कविता!
रागा'वलेली कविता अवडली.
अॅप्ट
:)
मस्त
सुंदरच!
कातिल, चाबुक
सुरेख! याला आणखी एक पैलू आहे
मस्त
In reply to सुरेख! याला आणखी एक पैलू आहे by संजय क्षीरसागर
धन्यवाद हो मिका!
In reply to मस्त by मिसळलेला काव्यप्रेमी
वा , सुंदर ओळी संजय क्षिरसागर
In reply to सुरेख! याला आणखी एक पैलू आहे by संजय क्षीरसागर
मस्त हो मिका!
आवडली. आम्ही फक्त मिका हे नाव
"आम्ही फक्त मिका हे नाव बघून काव्य विभागात येतो."
In reply to आवडली. आम्ही फक्त मिका हे नाव by सूड
गोंधळ
मिका
आपली पण संपूर्ण शरणागती!!
मस्त...
****
मस्त लिहिलीये.
अगदी गोड कविता आहे.
'त्या'च्या भावना अगदी नेमक्या
खूपच आवडली ही रचना.
नेहमीपर्माणेच रे मिका.
छान!
छान!