Skip to main content

अभय

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 07/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
या अवघ्या चराचरी व्यापलास तू हरी तरी आत बाहेरी शोध फसवा असा ll १ ll चालतसे देणी घेणी जीवा नित्य जन्मांतरी चिंता लागतसे मनी होईन पार कसा ll २ ll तूच बाप जननी येई पहा धावुनी या संसार काननी बाळ हाका मारीतसा ll ३ ll काळाचिये भक्ष आम्ही तिथे नाही विनवणी अभय मिळो शेवटी पायी तुझ्या लागतसा ll ४ ll - सार्थबोध
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2720
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख आणि रेखिव रचना..

ओघवती आहे. खूप आवडली.