ओठात माणसांच्या पोटातले उखाणे
मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे
आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी
एकांत सागराची पागोळते विराणी
थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे
ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे
कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे
साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी
मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना
आशा अजून वेडी संदेश हा पळांना
........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2577
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर!!
मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार आहे... ;)
कुठुन आणता हो शब्द?
मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार आहे... smiley
कुठुन आणता हो शब्द?
ते मलाही नक्की माहित नाही. तुमचा हेतू साध्य करण्यासाठी "मलाच उचलून न्यावं लागेल" शब्द सोबत येतील अशी आशा आहे. :)
डिक्शनरी
In reply to मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार by अज्ञातकुल
तुमच्या कवितेतले शब्द भारदस्त असतात. खरोखरच कधी कधी डिक्शनरीची गरज भासते.
+१
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
सारे खरे परंतू हृदयी उलाल
सुरेख!
mast mast.. khoopach chhan.. agreeing with MiKa
mast mast.. khoopach chhan.. agreeing with MiKa
सारे खरे परंतू हृदयी उलाल
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी
मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना
आशा अजून वेडी संदेश हा पळांना
खरेच सुरेख आहे...
संजीवनी जणू ही गत सुप्त
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना
आशा अजून वेडी संदेश हा पळांना>>> __/\__
क्या बात है! अप्रतिम !
क्या बात है! अप्रतिम !
क्या बात है. आवडली कविता
क्या बात है. आवडली कविता
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार :)
क्या बात है! अप्रतिम !
क्या बात है! अप्रतिम !
खुपच छान कविता आहे. आवडली
खुपच छान कविता आहे. आवडली
छान
सुंदर कविता. आवडली . "उलाल" शब्द खूपच वेगळा आणि छान वाटला..