Skip to main content

ठसे

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 11/07/2008 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
ठसे . सुखावलं की हसायचं.. मनोमन फुलायचं! दुखावलं की रडायचं.. आतल्या आत कुढायचं! सुख दुःखाच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा सुखाचा! एक ठसा दुःखाचा! एक ठसा खोल उमटून, एक नजरेतून गेला सुटून.. एका ठशात पाणी साठून, एक लाटेत गेला वाहून.. मागे वळून पाहताना मग.. तळीच येतात दिसून!! तळ्यां काठच्या सागरी फेणफुले जाती गळून! ========================== स्वाती फडणीस........ ०५-०७-०८
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3832
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुख दुःखाच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा सुखाचा! एक ठसा दुःखाचा! वा! कविता थोडी अनवट परंतु सुरेख वाटली.. स्वातीताई, अजूनही येऊ द्या... तात्या.

आज मेजवानी स्वातीताईंकडुन !! >>तळ्यां काठच्या सागरी >>फेणफुले जाती गळून! फेणफुले ही कल्पना छान वाटली, वेगळी !

मला वाटतं 'मिपा'वर आपलं हे पहिलंच लिखाण! स्वागत!! तुमची कविता वाचून माझ्या मनात आलेल्या भावना तुम्हाला इथे वाचायला मिळतील. चतुरंग