ठसे
.
सुखावलं की हसायचं..
मनोमन फुलायचं!
दुखावलं की रडायचं..
आतल्या आत कुढायचं!
सुख दुःखाच्या किनारी,
ठसे उमटवत जायचं..
एक ठसा सुखाचा!
एक ठसा दुःखाचा!
एक ठसा खोल उमटून,
एक नजरेतून गेला सुटून..
एका ठशात पाणी साठून,
एक लाटेत गेला वाहून..
मागे वळून पाहताना मग..
तळीच येतात दिसून!!
तळ्यां काठच्या सागरी
फेणफुले जाती गळून!
==========================
स्वाती फडणीस........ ०५-०७-०८
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3830
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख..
मनापासून
विनंती...
In reply to मनापासून by स्वाती फडणीस
वा
मनापासून आभार
चांगला
सुंदर
सुंदर काव्य स्वातीताई!
मी कशी काय
तळ्याकाठच्या सागरी
छान ठसा उमटला.
मनापासून आभार