भानावरी आज आलो जरासा
माझाच मी भासलो एवढासा
समजावुनी या मनाला पुन्हा मी
दिधला नव्या कल्पनेला दिलासा
रडू कधीचे स्मरून हसलो
आणि टाकला भावनेने उसासा
जशी रात्र आणि दिवस हा जसा
कधी मी नकोसा कधी मी हवासा
नको दूर शोधू सुखाला अपूर्व
खेळच मुळी हा असे एवढासा
२४-४-१३ १८:०१
काव्यरस
वाचने
1114
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली
कविता आवडली. ही गझल आहे का? मला त्यातला फरक सांगता येणार नाही. पण पहिल्या ४ ओळीत जे वृत्त आहे, पुढच्या ओळींमधे कल्पना आवडली तरी शब्द त्याच वृत्तात वाटले नाहीत, केवळ एवढ्यासाठीच विचारते आहे.
हो. सुचताना गज़ल म्हणूनच
In reply to कविता आवडली by पैसा
हो. सुचताना गज़ल म्हणूनच सुचली.
झकास..........!!!
झकास..........!!!