भगोरिया
अपरे नाक भृकुटी चाप
लघु भाल ,गुलाबी गाल ,
सिह कटी ,उन्नत वक्ष ,
गालात खळी ,अपुरी चोळी.
फाटके नेसू ,मुखी हासु ,
वेचते वनबाला ,मोहाच्या फुला,
मोहाचा सुटेना मोह,मद्याचे साठले डोह ,
ढोलक्या ची थाप ,तालात पदचाप .
येता सण भगोरिया ,किरात धुंडती प्रिया ,
जीवाचे करुनी रान ,करिती मद्यपान,
प्राशुनी महुवाची दारू ,पळती बैसुनी वारू,
घेऊनी आनंद उरी,पळवती तरण्या पोरी.
लग्नाची सुंदर प्रथा,नसे चिंता कुणा वृथा.
डौलात निघते स्वारी.भिल्लाची रीतच न्यारी.
मस्त! अगदी मस्त!
भगोरिया
@तर ते दोघे पळून जातात व
सुंदर काव्य
छान झालीये कविता!
अशा तर्हेच्या लग्नाविषयी