Skip to main content

आयुष्यावर प्रेम करावे--

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 06/07/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे कधी वाटते का जाउ मी सोडून माझे सखे सोबती अशाच वेळी श्वास कोंडतो विझुनी जाते जीवन ज्योती येणे जाणे आणि थांबणे आपुल्या हाती नाहीच काही तोच मांडतो खेळ पसारा तोच नकळता आवरून घेई तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3212
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुंदर काव्य आहे. फक्त शेवटून दुसरी ओळ (...मातीत शेवटी जाणे आहे.....) जरा खटकली. म्हणजे अर्थ चपखल आहे पण शब्द थोडे खटकताहेत. "मातीशी तर अखेर नाते" जमेल का? पुष्कराज, मला कल्पना आहे की ही अगदि रावसाहेबांच्या "पी यल्, 'गच्ची'त 'ची' येत नाही काSSय शेवटी"? छाप सूचना आहे!!

छान कविता कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे तर मस्तच.

तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे कविता चांगली आहे. पुलेशु... तात्या.

कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे खूप आवडले

सुंदर आणि अर्थपूर्ण कविता.

कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे कडवे तर खासच. पुण्याचे पेशवे