मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्यावर प्रेम करावे--

पुष्कराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे कधी वाटते का जाउ मी सोडून माझे सखे सोबती अशाच वेळी श्वास कोंडतो विझुनी जाते जीवन ज्योती येणे जाणे आणि थांबणे आपुल्या हाती नाहीच काही तोच मांडतो खेळ पसारा तोच नकळता आवरून घेई तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे

वाचने 3203 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मिसळपाव Mon, 07/07/2008 - 05:41
सुंदर काव्य आहे. फक्त शेवटून दुसरी ओळ (...मातीत शेवटी जाणे आहे.....) जरा खटकली. म्हणजे अर्थ चपखल आहे पण शब्द थोडे खटकताहेत. "मातीशी तर अखेर नाते" जमेल का? पुष्कराज, मला कल्पना आहे की ही अगदि रावसाहेबांच्या "पी यल्, 'गच्ची'त 'ची' येत नाही काSSय शेवटी"? छाप सूचना आहे!!

शितल Mon, 07/07/2008 - 05:58
छान कविता कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे तर मस्तच.

विसोबा खेचर Mon, 07/07/2008 - 08:49
तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे कविता चांगली आहे. पुलेशु... तात्या.

यशोधरा Mon, 07/07/2008 - 08:58
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे खूप आवडले