✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी बायको..

स — स्मिता चौगुले, Fri, 02/15/2013 - 15:53
ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक.. म्हणून म्हंटल हटके) माझी बायको.. प्रत्येक मुलाच एक स्वप्न असत माझी बायको हि वेगळी असावी सर्व रंग - गुणांचं मिश्रण अशी ती इंद्रधनूची छटा असावी आकाशातील नक्षत्राची चांदणी वाटावी सोज्वळ-सोबर तिची प्रतिमा असावी सगळ्यात उठून दिसणारी स्वप्नं मुग्धा अशी ती मोहिनी असावी सगुणांच प्रतिक जशी प्रेम– वास्तल्याची मूर्ती वाटावी माझ्या ओंजळीत सुख सांडणारी   अशी ती संपदा असावी शांत, गंभीर ,पोक्त अशी संस्कारांचा पुतळा असावी कधी बालिश,पोरकट भासणारी   अशी ती चंचला असावी चतुर, अभिमानी,काटकसरी अशी व्यवहार कुशल ती गृहिणी असावी प्रसन्न, हसतमुख, गरीब गाय अशी ती कल्याणी असावी   सुखदु:खात साथ देणारी संकटात आशेचा किरण  वाटणारी निराशेच्या प्रत्येक वाटेवर सोबत करणारी अशी ती प्रेरणा असावी क्लेशाला दूर सारणारी वेदनेवर फुंकर घालणारी माझ्या चुका पदरात घेणारी अशी ती हर्षदा असावी या सगळ्या गुणांचं मिश्रण अशी ती इंद्रधनूची छटा असावी कारण ..... प्रत्येकालाच वाटत माझी बायको हि सगळ्यात  वेगळी असावी  ... :) ....स्मिता चौगुले मिपाकरांनी या विषयीचे आपले अनुभव जरूर मांडावेत..:)

प्रतिक्रिया द्या
15445 वाचन

💬 प्रतिसाद (64)

(No subject)

जेनी...
Sat, 02/16/2013 - 01:00 नवीन
:-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

छान. कविता मजेदार वाटली.

श्रिया
Fri, 02/15/2013 - 21:52 नवीन
छान. कविता मजेदार वाटली.
  • Log in or register to post comments

आणि एक महत्वाचे, झुरळास

अधिराज
Fri, 02/15/2013 - 22:59 नवीन
आणि एक महत्वाचे, झुरळास घाबरणारी नसावी, कसें? स्मिताताई कविता छान जमली आहे.
  • Log in or register to post comments

असहमत. बैको झुरळाला

बॅटमॅन
Sat, 02/16/2013 - 00:05 नवीन
असहमत. बैको झुरळाला घाबरल्याने एरवी चान्स नसला तरी त्यासंदर्भात तरी तिच्यासमोर वीरश्रीचे प्रदर्शन करायला मिळते हे विसरलात होय =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

कविता आवडली. इतकी

शुचि
Sat, 02/16/2013 - 00:22 नवीन
कविता आवडली. इतकी सर्वगुणसंपन्न मुलगी - कठीण आहे.
  • Log in or register to post comments

आं?

उपास
Sat, 02/16/2013 - 03:23 नवीन
कन्या राशीची सहाव्या घरातील शुक्रवाली पण नाही चालणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ते लग्न करायचय का आयटेम साँग यावर

संजय क्षीरसागर
Sat, 02/16/2013 - 09:05 नवीन
अवलंबून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

कठीण आहे !

मनीषा
Sat, 02/16/2013 - 12:08 नवीन
कठीण आहे ! सिलेक्षन (म्हणजे निवड ..) साठी इतके फिल्टर्स लावले तर रिझल्ट काय मिळणार? खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचे मत नसलेली आणि आज्ञाधारक, अशी पाहिजे... बाकी सगळ्या निव्वळ कविकल्पना. सॉरी स्मिता ताई अवांतरच पहिल्यांदा लिहिले .. कविता छान आहे बरं का .
  • Log in or register to post comments

बरी आहे कविता. आता उलट्या

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 02/16/2013 - 12:47 नवीन
बरी आहे कविता. आता उलट्या बाजूने लिहा.
  • Log in or register to post comments

येव्ह्ढ लांबलचक काव्य

सुहास..
Sat, 02/16/2013 - 13:03 नवीन
येव्ह्ढ लांबलचक काव्य लोहिण्यापेक्षा सरळ 'मुकी* बायको ' पाहिजे असे लिहायचे ना ;) मुकी म्हणजे मुकीच ;)
  • Log in or register to post comments

हो...

दादा कोंडके
Sun, 02/17/2013 - 17:31 नवीन
आणि आंधळी सुद्धा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल

स्मिता चौगुले
Mon, 02/18/2013 - 08:52 नवीन
धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल
  • Log in or register to post comments

????

मृणालिनी
Mon, 02/18/2013 - 20:17 नवीन
आंधळी आणि मुकी बायको? कशाला? त्यापेक्षा लग्नच नका . फ्री बर्ड फॉर एव्हर !! :) बाकी कविता छानच झाली आहे.
  • Log in or register to post comments

(No subject)

स्मिता चौगुले
Tue, 02/19/2013 - 09:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा