माझी बायको..
ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक.. म्हणून म्हंटल हटके)
माझी बायको..
प्रत्येक मुलाच एक स्वप्न असत
माझी बायको हि वेगळी असावी
सर्व रंग - गुणांचं मिश्रण
अशी ती इंद्रधनूची छटा असावी
आकाशातील नक्षत्राची चांदणी वाटावी
सोज्वळ-सोबर तिची प्रतिमा असावी
सगळ्यात उठून दिसणारी स्वप्नं मुग्धा
अशी ती मोहिनी असावी
सगुणांच प्रतिक जशी
प्रेम– वास्तल्याची मूर्ती वाटावी
माझ्या ओंजळीत सुख सांडणारी
अशी ती संपदा असावी
शांत, गंभीर ,पोक्त अशी
संस्कारांचा पुतळा असावी
कधी बालिश,पोरकट भासणारी
अशी ती चंचला असावी
चतुर, अभिमानी,काटकसरी अशी
व्यवहार कुशल ती गृहिणी असावी
प्रसन्न, हसतमुख, गरीब गाय
अशी ती कल्याणी असावी
सुखदु:खात साथ देणारी
संकटात आशेचा किरण वाटणारी
निराशेच्या प्रत्येक वाटेवर सोबत करणारी
अशी ती प्रेरणा असावी
क्लेशाला दूर सारणारी
वेदनेवर फुंकर घालणारी
माझ्या चुका पदरात घेणारी
अशी ती हर्षदा असावी
या सगळ्या गुणांचं मिश्रण
अशी ती इंद्रधनूची छटा असावी
कारण ..... प्रत्येकालाच वाटत
माझी बायको हि सगळ्यात वेगळी असावी ... :)
....स्मिता चौगुले
मिपाकरांनी या विषयीचे आपले अनुभव जरूर मांडावेत..:)
(No subject)
छान. कविता मजेदार वाटली.
आणि एक महत्वाचे, झुरळास
असहमत. बैको झुरळाला
कविता आवडली. इतकी
आं?
ते लग्न करायचय का आयटेम साँग यावर
कठीण आहे !
बरी आहे कविता. आता उलट्या
येव्ह्ढ लांबलचक काव्य
हो...
धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल
????
(No subject)