तुझी याद..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझी याद आली पहाटे पहाटे
जणु चांदण्याला खुली रात भेटे
तुझा स्पर्श होता तनु मोहरावी
मिठीने तुझ्या रातराणी फुलावी
तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी
फुलांनी ही हेवा करावा मनी
तुझे हट्ट सारे तुझ्या मागण्या या
तुला सावरीता मी हरवुन जावे
तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही
मला जाणवे की तुझे स्वप्न मी
दुरावा जरी हा तरी ओढ वाटे-
तुझी याद आली पहाटे पहाटे
वाचन
3034
प्रतिक्रिया
0