Skip to main content

तुझी याद..

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 27/06/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी याद आली पहाटे पहाटे जणु चांदण्याला खुली रात भेटे तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी तुझे हट्ट सारे तुझ्या मागण्या या तुला सावरीता मी हरवुन जावे तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही मला जाणवे की तुझे स्वप्न मी दुरावा जरी हा तरी ओढ वाटे- तुझी याद आली पहाटे पहाटे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3039
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान, कविता अशीच प्रवाही हवी. तुमच मूळ नाव कळ्ल तर बर होइल

मस्त कविता केली आहे. तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे तर सहीच.

तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे लय भारी..... (रातराणीच्या सुंगधाचा प्रेमी) मदनबाण.....

छान नादमय कविता, आवडली!

तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही मला जाणवे की तुझे स्वप्न मी दुरावा जरी हा तरी ओढ वाटे- तुझी याद आली पहाटे पहाटे क्या बात है फुलवा ... अजुन एक नितांतसुंदर कविता .. धन्यवाद !

धन्यवाद -शीतल्,पुश्कराज,फटू,मदन्बाण्,कौस्तुभ.. मनापासुन धन्यवाद