दुर रानात रानात
शीळ घुमली कानात
पाखरांची किलबील
पानात पानात
उभा बाजूला डोंगर
झरा वाहतो समोर
पाणी पिण्यासाठी त्यात
सोडले कुणी जनावर
शिवालय शांत भग्न
गुंतले त्यात मन
थेंब थेंब पाण्याचा
होई अभिषेक अर्पण
होती बरोबर शिदोरी
झाली तीची न्याहरी
दुपारी होईल काहीबाही
त्यालाच काळजी सारी
एकटेच चालायाचे
स्वत:शीच बोलायाचे
जंगल मोठे निबिड
निघून एकटेच जायचे
आला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून
- पाषाणभेद
(पुर्वप्रकाशित)
तो फटू म्या काढेल हाय म्हून टाकला. समोरचा डोंगर सोडून द्या पण बरोब्बर त्या मोठ्या झुडपाखाली एक ओहोळ या टेकडीखाली उतरत होता. मी एकटा गेलो होतो तेथे अर्थात अंगाला घाम वैगेरे काही आला नव्हता. एक छोटी टेकडीच आहे ती. बाकी सिच्चूवेशन म्या वर सांगेल तश्शीच व्हती.
थोडे अवांतर सांगतो.
येथे दोन शेजारी टेकड्या आहेत. त्या दोहोंच्या वरती दोन छोटी मंदीरे आहेत. वर उल्लेखलेला फोटो अन ओहोळ त्या मोठ्या झुडूपामागे जावून खाली उतरतो. ही निर्मीतीही येथलीच आहे.
शेवटच्या दोन कडवी खास आवडल्या.
एकटेच चालायाचे
स्वत:शीच बोलायाचे
जंगल मोठे निबिड
निघून एकटेच जायचेआला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून
क्लास!
पाभे मस्त कविता!
भेदक पाषाण आले,,, कविता घेऊन
आला सुर्य माथ्यावर
खूप छान.
छान कविता.
तो फटू म्या काढेल हाय म्हून
छान
दाट झाडीची रेघ दिसतेय तोच
थोडे अवांतर सांगतो.
छान
सुन्दर काळजाला हात घालणारी कविता
खूपच आवडले...
खास च !
दफोराव कविता आवडली ~