Skip to main content

माझेच मी....

सोमवार, 03/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच मी..... * कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो शहरात या, नाव माझेच मी विचारतो * असा दूर आलो, कळेना कुठे पोहोचलो प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो * काढले विकाया माझेच सर्वस्व मी दुकानात या, भाव माझेच मी विचारतो * तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे शत्रूस माझ्या, डाव माझेच मी विचारतो * जायबंदी शरपंजरी, शेवटी युद्धात मी किती जाहले, घाव माझेच मी विचारतो * -अशोक
लेखनविषय:

वाचने 2485
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडली कविता.

कविता/गजल आवडली.

माझेच मी विचारतो याने थोडं मीटर गंडलय असं वाटतंय "मी " काढून टाकला आणि म्हणून पाहिलं तर .. तर बरोबर वाटतंय अर्थात हे माझ निरीक्षण आहे... तसे असेलच असे नाही गझल आवडली

कविता छानच उतरली आहे. :) फक्त प्रत्येक प्रतिसादाला आपला उपप्रतिसाद न देता एकाच प्रतिसादात शक्य तेवढ्या प्रतिसादकांचे आभार मानले तरी चालतील. आपला स्नेहांकित - अन्या