Skip to main content

माझेच मी....

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी सोमवार, 03/09/2012 12:26 या दिवशी प्रकाशित केले.

माझेच मी.....

*
कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो
शहरात या, नाव माझेच मी विचारतो
*
असा दूर आलो, कळेना कुठे पोहोचलो
प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो
*
काढले विकाया माझेच सर्वस्व मी
दुकानात या, भाव माझेच मी विचारतो
*
तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे
शत्रूस माझ्या, डाव माझेच मी विचारतो
*
जायबंदी शरपंजरी, शेवटी युद्धात मी
किती जाहले, घाव माझेच मी विचारतो
*
-अशोक

लेखनविषय:

वाचने 2516
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

माझेच मी विचारतो

याने थोडं मीटर गंडलय असं वाटतंय

"मी " काढून टाकला आणि म्हणून पाहिलं तर .. तर बरोबर वाटतंय

अर्थात हे माझ निरीक्षण आहे... तसे असेलच असे नाही
गझल आवडली


कविता छानच उतरली आहे. :)

फक्त प्रत्येक प्रतिसादाला आपला उपप्रतिसाद न देता एकाच प्रतिसादात शक्य तेवढ्या प्रतिसादकांचे आभार मानले तरी चालतील.
आपला स्नेहांकित
- अन्या