माझेच मी.....
*
कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो
शहरात या, नाव माझेच मी विचारतो
*
असा दूर आलो, कळेना कुठे पोहोचलो
प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो
*
काढले विकाया माझेच सर्वस्व मी
दुकानात या, भाव माझेच मी विचारतो
*
तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे
शत्रूस माझ्या, डाव माझेच मी विचारतो
*
जायबंदी शरपंजरी, शेवटी युद्धात मी
किती जाहले, घाव माझेच मी विचारतो
*
-अशोक
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2516
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली.
कविता आवडली..
धन्यवाद!
In reply to कविता आवडली. by ज्ञानराम
धन्यवाद!
छान
आवडली कविता.
धन्यवाद !!
In reply to छान by मी_आहे_ना
धन्यवाद !!
धन्यवाद !!
In reply to छान by मी_आहे_ना
धन्यवाद !!
छान!
कविता/गजल आवडली.
ही गझल नाही !!
In reply to छान! by पैसा
ही गझल नाही !!
माझेच मी विचारतो याने थोडं
माझेच मी विचारतो
याने थोडं मीटर गंडलय असं वाटतंय
"मी " काढून टाकला आणि म्हणून पाहिलं तर .. तर बरोबर वाटतंय
अर्थात हे माझ निरीक्षण आहे... तसे असेलच असे नाही
गझल आवडली
धन्यवाद! ही गझल नाही !!
In reply to माझेच मी विचारतो याने थोडं by स्पा
धन्यवाद!
ही गझल नाही !!
विचार अगदी मननीय आहे...पण
विचार अगदी मननीय आहे...पण सगळं...नीट रांगेत घेऊन मांडायला हवय :)
धन्यवाद!
In reply to विचार अगदी मननीय आहे...पण by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद!
छान.
छान. :)
कविता छानच उतरली आहे. फक्त
कविता छानच उतरली आहे. :)
फक्त प्रत्येक प्रतिसादाला आपला उपप्रतिसाद न देता एकाच प्रतिसादात शक्य तेवढ्या प्रतिसादकांचे आभार मानले तरी चालतील.
आपला स्नेहांकित
- अन्या