जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली!
(श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! ;) )
हा लोट कसला, धूर असे हो दाट
अंधार दिवसा, कुठं दिसंना वाटं
कुण्या द्वाडानं हाणता गाडी
केली मनधरणी
सख्या रे, घामट मी तरुणी
धूळमाखला जर्द कोट अन् घाम घाम अंगात
ओघळणार्या थेंबांनांही कुबटवास दे साथ
कुठं पुसू मी, कशी पुसू मी, गेले भांबावुनी
थेंब उमलले चेहर्यावरती, प्राण दाटले डोळ्यात
केस गुंतले असती माझे, डबडबल्या त्या भेटीत
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले मी हरवुनी
चतुरंग
Taxonomy upgrade extras
वाचने
5928
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
ग्रेट!
मस्त
सुंदर
:)
छान..
आवडली
मस्त..
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे,
चुकून
In reply to सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे, by चतुरंग
चालायचंच!
In reply to चुकून by विकास
आस्वादक?
In reply to चालायचंच! by चतुरंग
आवडलं!
मस्त झालंय...