"तुला माझी साथ आहे"
शब्द, शब्दच राहतात,
तेव्हा वेदना हेलावते,
गोठतात नाजूक भावनाही!
चेहरा शांत असला,
तरी कोपरा दुखावलेला असतो- आतला!!
फक्त असे कोपरे दुमडत जाऊन,
मन संकुचित होऊ नये,
इतकंच जपतेय..
शेवटी,
मनाची 'परिटघडी'
जितकी नीटनेटकी
तितकाच आयुष्याला
कोरेपणा....!!
-वेणू
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1307
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
फुंकर