Skip to main content

परिटघडी...!

लेखक वेणू
सोमवार, 16/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माझी साथ आहे" शब्द, शब्दच राहतात, तेव्हा वेदना हेलावते, गोठतात नाजूक भावनाही! चेहरा शांत असला, तरी कोपरा दुखावलेला असतो- आतला!! फक्त असे कोपरे दुमडत जाऊन, मन संकुचित होऊ नये, इतकंच जपतेय.. शेवटी, मनाची 'परिटघडी' जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला कोरेपणा....!! -वेणू ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
लेखनविषय:

वाचने 1307
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

थंड शब्दांची फुंकर घालावीच लागते, कधी ना कधी कळतेपणानं, भळ्भळत्या जखमेवर ऊतारा म्हणून | स्वतःच्याच मनातल्या जखमा, ताज्या ठेवणं सोपं नाहिये, चेहरा कोरा ठेवून | परिट्घडिचा संसार, सांभाळलाय तरीहि, भावना गोठतातचं अजूनहि | जमेल , आयुष्यात ऊरलेल्या , हे हि जमेल , कधीतरी !