मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कवितेच्या कवितेची लावणी....

शेखस्पिअर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रेशमाच्या रेषांनी, निळ्या निळ्या शाईनी, टाकोटाक कशिदा मी काढीला, नाक नका मुरडू माझ्या कवितेला..|| नवी कोरी कविता लाखमोलाची भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची, गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू... लिहीत होतो कागदावर मी जोषात असा जोषात.. अवचित आली माझ्या मनात की मनात.. कुणी म्हणे प्रतिभा , कुणी कवीकल्पना..|| नाक नका मुरडू... भीड नाही ठेवली टीकाकारांची, मुरवत ना राखली सोम्या-गोम्यांची, कुणी माझ्या कवितेला छान का नं म्हणीना..|| नाक नका मुरडू...

वाचने 3771 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अरुण मनोहर Mon, 06/16/2008 - 03:02
टाळ्यांचा कडकडाट! =D> नवी कोरी कविता लाखमोलाची भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची, गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला नाक कशाला मुरडायचे ह्या छान विडंबनाला? उत्तम.

बेसनलाडू Tue, 06/17/2008 - 01:52
(लावणीप्रेमी)बेसनलाडू याला विडंबन म्हणावे काय? (पृच्छक)बेसनलाडू

चतुरंग Tue, 06/17/2008 - 02:05
उत्तम विडंबनांची जननी ठरावी ह्यात नवल ते काय? (ह्याच गाण्याचे केशवसुमारांनी केलेले विडंबनही प्रेक्षणीय आहे!) (स्वगत - केसु हल्ली बरेच दिवसात फिरकला नाही.. बॉडी दुखते आहे वाटतं? :? :P ) चतुरंग

अमोल केळकर Tue, 06/17/2008 - 13:49
नवी कोरी कविता लाखमोलाची भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची, गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू... विशेष आवडले

शितल Tue, 06/17/2008 - 17:19
मस्त विड्॑बन केले आहे आणि केशवसुमारा॑नी ही या आधी अगदी सह्ही विड॑बन केले होते.