Skip to main content

बाळाचा चाळा- कंटाळा !!!!!

लेखक बॅटमॅन यांनी गुरुवार, 29/03/2012 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
नोंदः सध्या मिपावर चालू असलेला कविता, नवकविता आणि विडंबनाच्या जिलब्यांचा पाऊस पाहून आम्ही ही बरेच दिवस आधी पाडलेली ब्लॉगवरील जिलबी सादर करीत आहोत. वृत्त- स्रग्धरा. कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा | देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा? लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा | किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा ||१|| वृत्त- शार्दूलविक्रीडित. चित्ती नाद उठे मनी पुटपुटे, आलस्य हे गोमटे | कैसा दीस उठे व रातहि कटे, दोघे जसे भामटे | तोंडीची जरि मक्षिका नच फुटे , तादात्म्य वाटे, पटे | जे कोणी दिवटे जगात फुकटे, हे त्यांपरी ओखटे ||२|| वृत्त- उपजाति. आलस्य आहे जगतात थोर | तयाविना विश्व पुरे असार | तयाविना कार्य महत्वहीन | तेणेगुणे शीण नसे “रुटीन”||३|| वृत्त- उपजाति. म्हणाल का लावियले पुराण? उपाय जो ह्यावरि रामबाण | तो ऐकता सोडुनिया उसासे | आलस्यभृत्यांत जावे अपैसे ||४|| - कंटाळा ब्लॉग चे प्रेरणे बद्दल आभार. http://kantala.blogspot.in/ आणि सरतेशेवटी - वृत्त- द्रुतविलंबित. न कळता पद अग्निवरी पडे| न करि दाह असे न कधी घडे | अलस नाम वदों भलत्या मिसें| सकल कार्यचि भस्म करीतसे||५|| – श्री .वामन नरहर शेषे, राहणार कोरेगाव कुमठे (सातारा) , यांची क्षमा मागून (!)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3815
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

बॅटमॅन साहेब , मस्त मस्त मस्त कविता कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा | देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा? लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा | किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा ह्या ओळी अफाट आहेत.३ तुम्हाला हात जोडुन नमस्कार. मस्त कविता

In reply to by प्रचेतस

तुम्ही हल्ली एकालाही सोडु नका.. मला वाटत प्रोग्रॅमच बनवुन टाकलाय.. आला नविन माल कि टाक

जेथे वाघळास१ कळले वृत्तांत२ सारे कसे जेथे आळश्यास३ स्फुरले फुलोर साहित्य हे जेथे नांदती सरससे राजे४ इथे आळशी तेथे मी खुशाल५ करतो त्यांची इथे संस्तुती १ वाघुळ म्हणजे वटवाघुळ. पक्षी बॅट, बॅटमॅन. २ मराठी अलंकारांतील छंद आणि वृत्ते अंतापर्यंत जाणून घेतल्याने मिळालेले ज्ञान. ३ आळशीपणाचा गौरव मानणार्‍याच्या आसपासही काव्य-निर्मितीचा हुरूप फिरकू नये. त्यातून अनवधानाने सृजन झालेच! ४ त्यात ह्या संकेतस्थळावर “आळशांचे राजे”ही आहेतच, तेव्हा अनवधानाने कधी राजनिर्मिती होईल हे सांगता येत नाही. ५ म्हणून मी निश्चिंतपणे त्यांच्या काव्यास संस्तुत (पक्षी वाचण्याकरता रेकमेंड) करत आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

कंटाळा डीटेलवारी व्यक्त केल्याबद्दल अनेक धन्यवादगळु बरं का गोळेसाहेब :)

In reply to by यकु

कंटाळ्याचा चाळा हा पाळा तीच साची लीळा बाकी नुसता मेंदूस पडलेला पिळा ;)

In reply to by बॅटमॅन

कंटाळा तो खुळा करीतसे वळवळा पाडोनी मेंदूस पिळा, हुळहुळा, हुळहूळा!! ;-)

अरे देवा....मिपाला झालंय काय? आधी कविता आणि मग त्या कवितांचे विडंबन .... डोळे पाणावले ;) अवांतर - वृत्तात कंटाळा अप्रतिम बसलाय :) :)

In reply to by बॅटमॅन

या काव्यरसाने ओथंबलेल्या रसिकांच्या उपस्थितीत बॅटमॅन यांना कुमठे मुक्कामी मिपाचे 'चोरोपंत'* अशी पदवी पुणेरी पगडीसह देण्यात येईल ;-) *(वाचकांचा कंटाळा चोरणारे म्हणून ;-) )

चोरोपंत!!! वा वा वा थ्यांकु हो यक्कुशेठ थ्यांकु थ्यांकु :) अवांतरः आमचे हे असले उद्योग पाहून आमच्या येका मित्रवर्यांनी आम्हांस कधीकाळी पदवी दिली होती त्याचे स्मरण जाहले. ती पदवी होती "यमक हराम" :D