✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाळाचा चाळा- कंटाळा !!!!!

ब — बॅटमॅन, गुरुवार, 03/29/2012 - 13:03
नोंदः सध्या मिपावर चालू असलेला कविता, नवकविता आणि विडंबनाच्या जिलब्यांचा पाऊस पाहून आम्ही ही बरेच दिवस आधी पाडलेली ब्लॉगवरील जिलबी सादर करीत आहोत. वृत्त- स्रग्धरा. कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा | देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा? लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा | किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा ||१|| वृत्त- शार्दूलविक्रीडित. चित्ती नाद उठे मनी पुटपुटे, आलस्य हे गोमटे | कैसा दीस उठे व रातहि कटे, दोघे जसे भामटे | तोंडीची जरि मक्षिका नच फुटे , तादात्म्य वाटे, पटे | जे कोणी दिवटे जगात फुकटे, हे त्यांपरी ओखटे ||२|| वृत्त- उपजाति. आलस्य आहे जगतात थोर | तयाविना विश्व पुरे असार | तयाविना कार्य महत्वहीन | तेणेगुणे शीण नसे “रुटीन”||३|| वृत्त- उपजाति. म्हणाल का लावियले पुराण? उपाय जो ह्यावरि रामबाण | तो ऐकता सोडुनिया उसासे | आलस्यभृत्यांत जावे अपैसे ||४|| - कंटाळा ब्लॉग चे प्रेरणे बद्दल आभार. http://kantala.blogspot.in/ आणि सरतेशेवटी - वृत्त- द्रुतविलंबित. न कळता पद अग्निवरी पडे| न करि दाह असे न कधी घडे | अलस नाम वदों भलत्या मिसें| सकल कार्यचि भस्म करीतसे||५|| – श्री .वामन नरहर शेषे, राहणार कोरेगाव कुमठे (सातारा) , यांची क्षमा मागून (!)

प्रतिक्रिया द्या
3772 वाचन

💬 प्रतिसाद (24)

बॅटमॅन साहेब , मस्त मस्त मस्त कविता

निश
गुरुवार, 03/29/2012 - 13:24 नवीन
बॅटमॅन साहेब , मस्त मस्त मस्त कविता कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा | देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा? लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा | किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा ह्या ओळी अफाट आहेत.३ तुम्हाला हात जोडुन नमस्कार. मस्त कविता
  • Log in or register to post comments

आवडली!

पैसा
गुरुवार, 03/29/2012 - 13:26 नवीन
कंटाळा कविता वृत्तात बांधून आवडली!
  • Log in or register to post comments

लै भारी.

प्रचेतस
गुरुवार, 03/29/2012 - 13:30 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

तुम्ही हल्ली एकालाही सोडु

शैलेन्द्र
गुरुवार, 03/29/2012 - 14:47 नवीन
तुम्ही हल्ली एकालाही सोडु नका.. मला वाटत प्रोग्रॅमच बनवुन टाकलाय.. आला नविन माल कि टाक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहो प्रतिसादच टाकतोय, विडंबन

प्रचेतस
गुरुवार, 03/29/2012 - 14:51 नवीन
अहो प्रतिसादच टाकतोय, विडंबन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

___/\___

सांजसंध्या
गुरुवार, 03/29/2012 - 13:38 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments

छान!

रसप
गुरुवार, 03/29/2012 - 13:55 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

बाळाचा चाळा -

विदेश
गुरुवार, 03/29/2012 - 15:38 नवीन
झकास आहे !
  • Log in or register to post comments

वृत्तबद्ध जिलब्या छान

मनीषा
गुरुवार, 03/29/2012 - 19:22 नवीन
वृत्तबद्ध जिलब्या छान आहेत. त्यातही शार्दुलविक्रिडित मधील 'आलस्य' पुराण फार आवडले.
  • Log in or register to post comments

चवदार जिलबि...

जेनी...
गुरुवार, 03/29/2012 - 19:39 नवीन
चवदार जिलबि...:D
  • Log in or register to post comments

तेथे मी खुशाल करतो त्यांची इथे संस्तुती

नरेंद्र गोळे
गुरुवार, 03/29/2012 - 19:52 नवीन
जेथे वाघळास१ कळले वृत्तांत२ सारे कसे जेथे आळश्यास३ स्फुरले फुलोर साहित्य हे जेथे नांदती सरससे राजे४ इथे आळशी तेथे मी खुशाल५ करतो त्यांची इथे संस्तुती १ वाघुळ म्हणजे वटवाघुळ. पक्षी बॅट, बॅटमॅन. २ मराठी अलंकारांतील छंद आणि वृत्ते अंतापर्यंत जाणून घेतल्याने मिळालेले ज्ञान. ३ आळशीपणाचा गौरव मानणार्‍याच्या आसपासही काव्य-निर्मितीचा हुरूप फिरकू नये. त्यातून अनवधानाने सृजन झालेच! ४ त्यात ह्या संकेतस्थळावर “आळशांचे राजे”ही आहेतच, तेव्हा अनवधानाने कधी राजनिर्मिती होईल हे सांगता येत नाही. ५ म्हणून मी निश्चिंतपणे त्यांच्या काव्यास संस्तुत (पक्षी वाचण्याकरता रेकमेंड) करत आहे.
  • Log in or register to post comments

कंटाळा डीटेलवारी व्यक्त

बॅटमॅन
गुरुवार, 03/29/2012 - 20:49 नवीन
कंटाळा डीटेलवारी व्यक्त केल्याबद्दल अनेक धन्यवादगळु बरं का गोळेसाहेब :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

उरी कळवळा वाहे खळखळा देखोनी

यकु
गुरुवार, 03/29/2012 - 20:04 नवीन
उरी कळवळा वाहे खळखळा देखोनी तव लिळा रे सूज्ञ बाळा, शब्द येती भळभळा! ;-)
  • Log in or register to post comments

कंटाळ्याचा चाळा हा पाळा तीच

बॅटमॅन
गुरुवार, 03/29/2012 - 20:48 नवीन
कंटाळ्याचा चाळा हा पाळा तीच साची लीळा बाकी नुसता मेंदूस पडलेला पिळा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कंटाळा तो खुळा करीतसे वळवळा

यकु
गुरुवार, 03/29/2012 - 20:51 नवीन
कंटाळा तो खुळा करीतसे वळवळा पाडोनी मेंदूस पिळा, हुळहुळा, हुळहूळा!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे देवा....मिपाला झालंय काय?

सुहास झेले
गुरुवार, 03/29/2012 - 20:17 नवीन
अरे देवा....मिपाला झालंय काय? आधी कविता आणि मग त्या कवितांचे विडंबन .... डोळे पाणावले ;) अवांतर - वृत्तात कंटाळा अप्रतिम बसलाय :) :)
  • Log in or register to post comments

कंटाळ्याचा पुरस्कार न

बॅटमॅन
गुरुवार, 03/29/2012 - 20:52 नवीन
कंटाळ्याचा पुरस्कार न कंटाळता, न टाळता केल्याबद्दल घ्या टाळी सकळही :)
  • Log in or register to post comments

या काव्यरसाने ओथंबलेल्या

यकु
गुरुवार, 03/29/2012 - 20:58 नवीन
या काव्यरसाने ओथंबलेल्या रसिकांच्या उपस्थितीत बॅटमॅन यांना कुमठे मुक्कामी मिपाचे 'चोरोपंत'* अशी पदवी पुणेरी पगडीसह देण्यात येईल ;-) *(वाचकांचा कंटाळा चोरणारे म्हणून ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चोरोपंत!!! वा वा वा थ्यांकु

बॅटमॅन
गुरुवार, 03/29/2012 - 21:02 नवीन
चोरोपंत!!! वा वा वा थ्यांकु हो यक्कुशेठ थ्यांकु थ्यांकु :) अवांतरः आमचे हे असले उद्योग पाहून आमच्या येका मित्रवर्यांनी आम्हांस कधीकाळी पदवी दिली होती त्याचे स्मरण जाहले. ती पदवी होती "यमक हराम" :D
  • Log in or register to post comments

"यमक हराम" ___/\___ !!!!

यकु
गुरुवार, 03/29/2012 - 21:05 नवीन
"यमक हराम" ___/\___ !!!! ___/\0_ !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तेच तर, अस्मादिकांची

बॅटमॅन
गुरुवार, 03/29/2012 - 21:10 नवीन
तेच तर, अस्मादिकांची प्रतिक्रिया तीच होती त्यावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

@ती पदवी होती "यमक हराम" >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/30/2012 - 18:45 नवीन
@ती पदवी होती "यमक हराम" >>> Image removed. निर्वाण पावलो आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लय म्हंजे लय भारी राव

जोशी 'ले'
Fri, 03/30/2012 - 07:06 नवीन
लय म्हंजे लय भारी राव
  • Log in or register to post comments

मस्त मस्त...मजा आली वाचताना

अविनाशकुलकर्णी
Fri, 03/30/2012 - 10:28 नवीन
मस्त मस्त...मजा आली वाचताना
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा