अंबरात फिरुनिया उगवतो....
लेखनविषय:
काव्यरस
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा
परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ ||
बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा
हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा
पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ ||
स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी
निळ्या बोलक्या.. डोळ्यांमधली, लाजलाजरी गाणी
छेडुनि गे_ला, केस मोकळे, कुठुनी रानचा वारा ..............|| २ ||
काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई
तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई
विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा ......................|| ३ ||
अंगण माझे फुलले हसले, तृप्तीने गं न्हाले
हिरवाईचा त्यागुन शालू, मन निळोसे झाले
चाफ्याच्या गंधाने महकला, देहाचा देव्हारा .................... || ४ ||
- संध्या
वाचने
2059
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
व्वा..! लयबद्ध...गेय्य...आणी सुंदर... रचना 

आत्माजी
थँक्स अ लॉट.. मनापासून आनंद झाला :)
काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नाराहे कडवे फारच छान..!! आवडली ..
सुंदर रचना!!
आवडली.
अस्वस्थामा आणि मिसळलेला काव्यप्रेमी.. आपले आभार :)
एकच नंबर... सुरेख रचना...
विडंबकांनी तलवारी म्यान केल्यात जणू..
असा चानस पुन्हा येणे नाही, बघा लेको.. फुल्टॉस आहे ;-)
In reply to विडंबकांनी तलवारी म्यान by यकु
@विडंबकांनी तलवारी म्यान केल्यात जणू..>>>
लयबद्ध...गेय्य...आणी सुंदर... रचना आहे ही..!,हीचं विडंबन मी पाडत नै ज्जा.. ;-)
In reply to @विडंबकांनी तलवारी म्यान by अत्रुप्त आत्मा
मी पाडत नै ज्जा.हे थेट http://www.hasyakallol.com/tillujoker.htm इथल्या मी नै म्हणत ज्जा सारखं ऐकू आलं.. नक्की ऐका..
मस्त... अजून येऊ द्यात :) :)
धन्यवाद सर्वांचे :)
मस्तच आहे... आवडली.
मस्त आहे...
अप्रतिम!!!
सर्वांचे आभार
व्वा..! लयबद्ध...गेय्य...आणी