Skip to main content

अंबरात फिरुनिया उगवतो....

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 04/03/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ || बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ || स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी निळ्या बोलक्या.. डोळ्यांमधली, लाजलाजरी गाणी छेडुनि गे_ला, केस मोकळे, कुठुनी रानचा वारा ..............|| २ || काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा ......................|| ३ || अंगण माझे फुलले हसले, तृप्तीने गं न्हाले हिरवाईचा त्यागुन शालू, मन निळोसे झाले चाफ्याच्या गंधाने महकला, देहाचा देव्हारा .................... || ४ || - संध्या
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2061
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा
हे कडवे फारच छान..!! आवडली ..

सुंदर रचना!! आवडली.

In reply to by यकु

@विडंबकांनी तलवारी म्यान केल्यात जणू..>>> लयबद्ध...गेय्य...आणी सुंदर... रचना आहे ही..!,हीचं विडंबन मी पाडत नै ज्जा.. ;-)