अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !
लेखनविषय:
काव्यरस
'विठ्ठल, विठ्ठल' - स्वर कानी आले
दर्शनास मोहित, मन माझे झाले !
पंढरीची वाट धरता मी थेट
वारकरी माझे आप्तजन झाले !
चंद्रभागी स्नान, देता अर्घ्यदान
पापाचे क्षालन देहाचे या झाले !
कामात विठ्ठल - नामात विठ्ठल
ध्यानात विठ्ठल - अती भ्रम झाले !
टाळ चिपळ्यात गुंतले दो कर
मनी नामस्मरण माऊलीचे झाले !
माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल
अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !
वाचने
2235
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल
अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले ! ---^---
In reply to माझा तो विठ्ठल - त्याचा हा by अत्रुप्त आत्मा
+१
हरी ओम विठ्ठल.. ---^---
सुंदर........!
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा....
वा वा!!
विठ्ठल नामाची शाळा भरली!!
सुंदर
अमोल केळकर
माझा तो विठ्ठल - त्याचा हा