✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समीकरणे

य — यश पालकर, गुरुवार, 12/22/2011 - 16:50
सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत

प्रतिक्रिया द्या
1954 वाचन

💬 प्रतिसाद (7)

मस्त!!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 12/22/2011 - 17:05 नवीन
बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती
हे छान जमले आहे. पण कां कुणास ठाऊक, अपुरी वाटते ती कविता!!
  • Log in or register to post comments

मलाही तसेच वाटले होते पुन्हा

यश पालकर
गुरुवार, 12/22/2011 - 17:26 नवीन
मलाही तसेच वाटले होते पुन्हा एकदा थोडा बदल करून सूचनेबद्दल धन्यवाद ... सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत गवसतील तेव्हा रेषांना कधी कोन काटकोन त्रिकोण आणि बदलून जाईल नशीब मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत
  • Log in or register to post comments

हम्म!!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 12/22/2011 - 17:28 नवीन
आता पूर्ण वाटतेय. मस्त झालीये रचना. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

ह्या कवितेचे सुगम मराठी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/22/2011 - 17:30 नवीन
ह्या कवितेचे सुगम मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?
  • Log in or register to post comments

ह्या कवितेचे सुगम मराठी

यश पालकर
गुरुवार, 12/22/2011 - 18:24 नवीन
ह्या कवितेचे सुगम मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ? म्हणजे काय समझल नाही
  • Log in or register to post comments

सदर कविता वाचुन मी इयत्ता

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 12/22/2011 - 18:32 नवीन
सदर कविता वाचुन मी इयत्ता दुश्ली - अ वर्ग- आय. ई. एस. मराठी माध्यम शाळा, पवई येथे पुन्हा एकदा अ‍ॅडमिशन घेण्यासाठी चाललो आहे.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/22/2011 - 22:49 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा