सोडवत आहे एकरेषीय समीकरणे
प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष
स्थापिला बिंदू स्वःतचा
सोबतिला जरी असतिल अनेक
बिंदूमधील अंतरे नात्याची
काही जवळ तर काही दूरची
निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे
सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत
बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
असेच करता करता सुटतील समीकरणे
उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती
यशवंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1965
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!
मलाही तसेच वाटले होते पुन्हा
हम्म!!
ह्या कवितेचे सुगम मराठी
ह्या कवितेचे सुगम मराठी
सदर कविता वाचुन मी इयत्ता
(No subject)
In reply to सदर कविता वाचुन मी इयत्ता by इंटरनेटस्नेही