Skip to main content

समीकरणे

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 22/12/2011 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत
लेखनविषय:

वाचने 1965
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती
हे छान जमले आहे. पण कां कुणास ठाऊक, अपुरी वाटते ती कविता!!

मलाही तसेच वाटले होते पुन्हा एकदा थोडा बदल करून सूचनेबद्दल धन्यवाद ... सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत गवसतील तेव्हा रेषांना कधी कोन काटकोन त्रिकोण आणि बदलून जाईल नशीब मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत

आता पूर्ण वाटतेय. मस्त झालीये रचना. पु.ले.शु.

सदर कविता वाचुन मी इयत्ता दुश्ली - अ वर्ग- आय. ई. एस. मराठी माध्यम शाळा, पवई येथे पुन्हा एकदा अ‍ॅडमिशन घेण्यासाठी चाललो आहे.