Skip to main content

रानातल्या फुलांचा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 16/12/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो. रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त आहे मी कोणता स्वयंभू...? त्याचे निमित्त आहे वेडाहि मीच थोडा देवाजिच्या मुलांचा वेडास वेढणार्‍या रानातल्या फुलांचा... =====================================================================
काव्यरस

वाचने 3618
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वा वा! आवडली. आनंद, प्रेम, कृतज्ञता सारं जाणवतंय! छान. :)
सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त आहे मी कोणता स्वयंभू...? त्याचे निमित्त आहे
खूपच छान!'तत्त्वमसि'ची आठवण झाली! आता पुन्हा एकदा वाचणार. :)

अतिशय सुंदर.
राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला
अगदी खरे आहे.

व्वा व्वा सुंदर सुरेख काव्य निर्मिती ---^--- :) सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त आहे मी कोणता स्वयंभू...? त्याचे निमित्त आहे शेवटी कर्ता करवीता तोच आहे आपण फक्त निमित्त मात्र.

खुप आवडल्या गेली आहे. :)