रानातल्या फुलांचा
जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो.
रानात जाउनी मी
होइन या फुलांचा
सहवास देवतांच्या
बागेतल्या मुलांचा...
किती रंगरुप त्यांचे
व्हावे मनात गोळा
भरगच्च रानराइ
वाटे ही सांब भोळा
मी एकटाच त्यांची
बांधेन देवळेही
परि मुळ तत्व त्यांचे
आहेच देवळे-ही
राना मधेच देव
मानायचाच झाला
रानामधुन फुलता
तो रान रान झाला
त्याचीच रूपकेही
त्याने प्रतीत केली
आंम्ही खुळ्या जनांनी
भक्तीत सोय केली
सारे अखेर त्याचे
त्याचेच फक्त आहे
मी कोणता स्वयंभू...?
त्याचे निमित्त आहे
वेडाहि मीच थोडा
देवाजिच्या मुलांचा
वेडास वेढणार्या
रानातल्या फुलांचा...
=====================================================================
वा वा! आवडली. आनंद, प्रेम,
+१
अतिशय सुंदर. राना मधेच
क्या बात है...
सुंदर!
मे.वे.,वल्ली,आ.शू,प्राजु
निव्वळ अप्रतिम
खुप
दुर्लक्षित रानफुलांचा तुम्ही
स्पा,च.चाणक्य,मि.का.,जागु
व्वा , खूप सुन्दर