जीर्णोद्धार
सुन्या आयुष्यास उरला ...
तुझ्या आठवांचा आधार
पुन्हा करतो आहे मीच ...
जुन्या जखमांचा जीर्णोद्धार
मन-मंदिरात गंधाळलेल्या ...
विझल्या सगळ्याच वाती
तुजविण झालेल्या अंधारात ...
उरल्या भकास एकल्या राती
केलास हिशेब सहज अन ...
चुकले गणित जगण्याचे
उरले गाठीशी सखये आता ...
नुसते आभास आसवांचे
आता अंधाराचे नाही सखये ...
वाटते मज उजेडाचे भय
अन श्वासाश्वसास माझ्या ...
आता लागली भैरवीची लय
अखेरचे हे गाणे (गाऱ्हाणे) माझे ...
सखे फ़क़्त तुझ्याच साठी
घेऊन जातो दुख्खे भरून ...
सुखी रहा तू माझ्या पाठी
सुखी रहा तू माझ्या पाठी
- विश्वेश
वाचने
1737
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
छान
वा वा सुंदर पण हे असे
In reply to वा वा सुंदर पण हे असे by पाषाणभेद
शक्य आहे.
In reply to शक्य आहे. by प्रास
पाशवि ... :)
अप्रतिम कविता
जखमांचा जीर्णोद्धार ही कल्पना
छान कविता...
सुंदर कविता...