Skip to main content

जीर्णोद्धार

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 03/10/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्या आयुष्यास उरला ... तुझ्या आठवांचा आधार पुन्हा करतो आहे मीच ... जुन्या जखमांचा जीर्णोद्धार मन-मंदिरात गंधाळलेल्या ... विझल्या सगळ्याच वाती तुजविण झालेल्या अंधारात ... उरल्या भकास एकल्या राती केलास हिशेब सहज अन ... चुकले गणित जगण्याचे उरले गाठीशी सखये आता ... नुसते आभास आसवांचे आता अंधाराचे नाही सखये ... वाटते मज उजेडाचे भय अन श्वासाश्वसास माझ्या ... आता लागली भैरवीची लय अखेरचे हे गाणे (गाऱ्हाणे) माझे ... सखे फ़क़्त तुझ्याच साठी घेऊन जातो दुख्खे भरून ... सुखी रहा तू माझ्या पाठी सुखी रहा तू माझ्या पाठी - विश्वेश
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1740
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान आहे. आवडली.

In reply to by पाषाणभेद

पण पाभेभौ,
केलास हिशेब सहज
असं जे कवी म्हणतोय त्यावरून 'तिला' या म्हणण्याने काही दु:ख वगैरे होईल असं वाटत तरी नाही. आणि पुढे असंही वाटतंय की जर या शब्दांनी तिला दु:ख झालंच तर कवीचीही तशीच इच्छा असावी. अशी इच्छा असणार्‍या कवीला 'पाशवी' कवी का म्हणू नये? ;-)

जखमांचा जीर्णोद्धार ही कल्पना आवडली. पहिली काही कडवी छान झाली आहेत. नंतर कवितेने पकड सोडल्यासारखी वाटली. आभास आसवांचे हे इतर अर्थसमुच्चयाला तितकं नीट जुळत नाही. लिहीत रहा.

सहज कारूण्याने भरलेली कविता. आवडली. तारूण्यातील काही आठवणींचा 'जीर्णोद्धार' झाला. केलास हिशेब सहज अन ... चुकले गणित जगण्याचे उरले गाठीशी सखये आता ... नुसते आभास आसवांचे ह्या कडव्यातील 'आभास' शब्द मलाही खटकला. 'आभास' हा भ्रामक अनुभवासाठी वापरतात असे वाटते. आसवांचा 'आभास' असेल तर ते अश्रू खरे नव्हेत असे सूचित होते आहे. 'आभास' ऐवजी 'प्रपात' शब्द जास्त योग्य वाटतो. तसे मला कवितेतील फार काही कळते अशातला भाग नाही तरी थोडे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकत असेल तर मोठ्या मनाने माफ करावे.