Skip to main content

पुणेरी हायकू -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 02/09/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते डांबरी जाहिरात सामोरी... ... गाडी खड्ड्यात ! लाल सिग्नल वाहतूक सुसाट - मोक्षाची वाट ! एक ते चार दुकानदारी गार - बाणा मराठी ! देव आमचा बगीचा शेजाऱ्याचा ... त्रस्त कुंपण सख्खे शेजारी ' केरा ' तून वैरात - ' खांदा ' वांध्यात !

वाचने 5606
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

खि..खि..खि :D एक ते चार दुकानदारी गार - बाणा मराठी ! देव आमचा बगीचा शेजाऱ्याचा ... त्रस्त कुंपण हे लय भारीये राव.

देव आमचा बगीचा शेजाऱ्याचा ... त्रस्त कुंपण खिक्क :bigsmile: अवांतरः- कविता by विदेश रहाता भारत देश(?) तूम हायकू पुणेरी?.... :wink:

+१

ह्यात पुणेरी काय आहे ते कळाले नाही. असे शिर्षक देऊन ट्यार्पी वाढवायचा प्रयत्न ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

असाच प्रश्न पडला आहे.

In reply to by रमताराम

ररा, प्लीज, मला यातले हायकू काय आहेत ते समजावून सांगा ना जरा. मला हायकू कळत नाहीत. पण इथं या तीनोळीत काही तरी कमेंट केली आहे जी मला आवडली. ती हायकू कशी आहे तेवढं समजलं तर, माझा आनंद द्विगुणित होईल. तेवढं पुण्य गाठीला बांधता येईल तुम्हालाही.

In reply to by श्रावण मोडक

धागे टूकार प्रतिक्रिया भिकार... ... मिपा खड्ड्यात! हिरवा सिग्नल जिलब्या मोकाट - संस्थळाची वाट ! सोमवार ते रविवार सदस्य नित्राण - संपादक वाचनमात्र ! विडंबन आमचे लेख दुसर्‍याचा ... पंख लागती सारख्याच प्रेरणा ' जात्या ' तून सूपात - ' कंपूबाज ' वांध्यात !

In reply to by परिकथेतील राजकुमार

(१) 'बाबा' पेटले रात्रीच निसटले ... 'योग' मायेने (२) चेले तरूण वृध्दा का उपोषण? ... ठाकरी बाणा (३) येता गोत्यात पाळतो मौनव्रत ...जाणता राजा (४) काव्यप्रसवू हौसेला मोल नाही ... हायकू पाडा

In reply to by श्रावण मोडक

आता मी काय डोंबलं समजावणार तुम्हाला. हे म्हणजे 'ना*ड्याशेजारी उघडं गेलं आणि...' तसं व्हायचं. जालावरच्या कविता वाचून आपली कविता वाचण्याची इच्छाच संपली आहे. मुळात कविता कशाला म्हणायचं याबाबतच डोस्क्यात लै गोंधळ निर्माण झालाय आता. बुद्धिभेद का काय म्हणतात तो झालाय म्हणाना. आणि 'हायकू' हा शब्द 'बायकू' शब्दाच्या समोच्चारी असल्याने धसक्याने आपण लांबच आहोत त्यापासून. तसेही अन्य भाषेतून, भौगोलिक स्थितीतून मराठीत आले की त्या काव्यप्रकारांची 'कोंबडीचं भरीत*' अशी अवस्था होते. गजलेचे तेच नि हायकूचेही तेच. असो. आज एवढी शिकवणी पुरे. घरचा अभ्यास म्हणून शिरीष पैंच्या हायकू वाचून त्यांचे रसग्रहण लिहून आणा उद्या. (*प्रताधिकार आमच्या नावे रेजिस्टर्ड आहे.)

In reply to by रमताराम

घरचा अभ्यास पाहून ठरवून टाकलं, की बास्स. स्वगत: हायकू कायकू? वो न समझनेसे तेरा कुछ बिगडता तो नै ना... तो छोड दे.

In reply to by श्रावण मोडक

विदेश यांच्या हायकूमध्ये आणि जपानी (तसेच बहुतेक इंग्रजी) हायकूंमध्ये हे साम्य आहे : ५ अक्षरे ७ अक्षरे ५ अक्षरे (जपानीमध्ये "अक्षरे" नसून "मात्रा" असतात.) विदेश यांच्या हायकूंमध्ये तीनपैकी दोन ओळींमध्ये बहुतेक अंत्ययमक असते. हे त्यांचे शैलीवैशिष्ट्य आहे. (अन्य हायकूंमध्ये असा काही नियम नाही.) विदेश यांच्या हायकूत पहिल्या दोन ओळींत एक कथानक असते, आणि तिसर्‍या ओळीत त्यावर भाष्य असते. (अन्य हायकूंमध्ये असा काही नियम नाही.) विदेश यांना हायकूमध्ये सूचकतेपेक्षा शब्दांनी थेट अर्थच सांगणे आवडते. पारंपरिक हायकूंपेक्षा ही विपरित रीत आहे. विदेश यांचा नाविन्याचा आविष्कार आहे.