कुणाला कुणाचे कशाला हवे
कुणाला कुणाचे कशाला हवे
- - -
जळाला तळ्याचे कशाला हवे
मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे
कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे
रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले
मढे माणसाचे कशाला हवे
.
प्रिया बांध रे बंध नाजूकसे
परी त्यात काचे कशाला हवे
.
मला दाखवी रूप माझे खरे
हसे आरशाचे कशाला हवे
.
धन्या फायद्याचे पहा नीटसे
लळे चाकराचे कशाला हवे
- - -
कविता आवडली.
धन्या हा श्लेष आवडला.
रचना फारच आवडली
उच्च!
चांगली
प्रकाटाआ
छान
गझल आवडली.
सहमत
गझल आवडली..
कविता, गझल वैग्रे प्रकार कळत
आम्हाला तुमचे -
दिल बहलाने के लिये
:-)
गजल खूप आवडली
कविता उत्तम आहे
मस्तच
आवडली कविता ..हल्ली मला असेच
मस्तच.
मला दाखवी रूप माझे खरे हसे
कविता आवडली. दुखवट्यामध्येही
छान कविता धनंजयसर.