✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जगरीती

श — शैलेन्द्र, Fri, 06/17/2011 - 13:57
हळुच मंद मालवे, कालचा नवा शशी, हळुच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी... विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधु पिशी.. मनास ओढ लावते, एक खिन्नशी भिती, झरत झरत जातसे, अस्फुट्शी कालगती, फिरुन परत येतसे, भ्रमीत मुग्ध नेणीवशी.. आहेस जरी मजसवे, तिच तुच, तव प्रीती नाहीच का राहीलो, मीही तोच, जगरीती? धुसर का होतसे, हे सत्य स्वप्न शुक्राशी..

प्रतिक्रिया द्या
1997 वाचन

💬 प्रतिसाद (10)

अजून खुलवता आली असती.

दत्ता काळे
Fri, 06/17/2011 - 14:06 नवीन
पहिल्या दोन ओळी ( धृपद ) आणि पहिलेच कडवे एकदम छान जमले आहे. म्हणजे फारच सुंदर. नंतरच्या दोन कडव्यातल्या शेवटच्या ओळी, कविता पटकन संपवावी ह्या ईर्षेने, तर टाकल्या नाहीत ना ? अशी शंका येतेय.
  • Log in or register to post comments

मान्य, थोडासा प्रयत्न केलाय..

शैलेन्द्र
Fri, 06/17/2011 - 14:33 नवीन
मान्य, थोडासा प्रयत्न केलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

छान कविता

गणेशा
Fri, 06/17/2011 - 14:15 नवीन
हळुच मंद मालवे, कालचा नवा शशी, हळुच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी... अप्रतिम ... लिहित रहा.. वाचत आहे
  • Log in or register to post comments

मस्त!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 06/17/2011 - 14:23 नवीन
मस्त!! शेवटच्या कडव्यात मीटर गडबडले आहे काय?
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

शैलेन्द्र
Fri, 06/17/2011 - 20:20 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

थोडासा प्रयत्न केलाय सुधरायचा

शैलेन्द्र
Fri, 06/17/2011 - 20:22 नवीन
थोडासा प्रयत्न केलाय सुधरायचा
  • Log in or register to post comments

तरल

राजेश घासकडवी
Fri, 06/17/2011 - 21:05 नवीन
जगरीतीशी नातं सांगणारी कविता आवडली. वेगळा विषय भावला. कालचा मी संपलो आणि तरी स्मृती आहेत - हे सांगण्यासाठी नव्या दिवसाच्या नव्या पहाटेची पार्श्वभूमीदेखील अनुरूपच. विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, मध्ये अनुप्रास छान साधला आहे. पुढच्या कडव्यांत झरत झरत आणि फिरुनि परत ने तो अधोरेखित होतो. शेवटच्या कडव्यात अजून तांत्रिक सुधारणा करता येतील... अजून लिहा.
  • Log in or register to post comments

बरोबर, पुढच्या वेळी सुधरायचा

शैलेन्द्र
Sat, 06/18/2011 - 18:34 नवीन
बरोबर, पुढच्या वेळी सुधरायचा प्रयत्न करतो, तुमची प्रतिक्रिया नेहमीच समाधान देते.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आवडली!

नगरीनिरंजन
Sat, 06/18/2011 - 06:46 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

दखल घेतल्याबद्दल सगळ्यांचे

शैलेन्द्र
Mon, 06/20/2011 - 11:32 नवीन
दखल घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा