नसबंदी
लेखनविषय:
काव्यरस
मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी
उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी
रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी
शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी
आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले
सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले
नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली
घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली
आता बघतो चौरस गोंडस कुटुम्बलेले कितीक, छोट्या
दो चिमण्यांना कडी घेउनी शिस्तित चालत रेषा कोत्या
इंग्लिश मिडियम फॉरिन वारी खुराक अन् बी कॉम्प्लेक्सचे
फेसबुकावर पडती फोटो भरतनाट्यचे अन मुंजीचे
गोजिरवाणी स्वप्ने माझी घरंदाज पण बिना वारशी
वणवण फिरती अर्धनागडी खुरटी रोगट आणि उपाशी
रोध बरा सृजनाला अंध्या "दो ही बस" स्वप्नांची धुंदी
भाग्य नसे जर षंढत्वाचे करून घ्यावी हो नसबंदी
वाचने
3650
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
छोटे कुटूंब सुखी कुटूंब. हम
हिडीस वाटले...
In reply to हिडीस वाटले... by मनिष
दोन कवितांमधील भेग
In reply to दोन कवितांमधील भेग by धनंजय
कवितेचे दोन भाग केले
म्हातारचळ लागल्यावर असे सपक
स्लमडॉग प्लेबॉय जनकल्याण
"एक ननैतिक बघ्या"
धन्यवाद
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
विसूनानांनी केलेलं विश्लेषण
In reply to विसूनानांनी केलेलं विश्लेषण by नगरीनिरंजन
ह्या अर्थाने ही कविता लिहीली
वरवर चूक खोलवर अचूक?
मूळ कविता अजिबात समजली नसती,
आयला लै भारी ... आपल्याला
कविता आवडली.
आशय
अस्वस्थ करणारा अनुभव,