थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे.
======================================
परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन |
.......... काल रात्री ||
परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन |
.......... काल रात्री ||
या रिकाम्या घरात धडपडतांना |
सैरभैर तुझ्या शोधात फिरतांना |
खिडकीत बसून तुझी वाट पाहतांना |
कळले कि सारे सारे मेघ दाटून आले .......... काल रात्री ||
नुरली कुठलीही भानाची वस्त्रे |
थरारली शहारली देहाची गात्रे |
चालवली सांजवेळी वेदनेची सत्रे |
वाटले कि सारे सारे गारठून गेले .......... काल रात्री ||
खिडक्यांचे गज मजबूत काळे |
समोरील चाफ्याचे नाजूक फुल कोवळे |
अन् इथे माझे थकलेले हताश डोळे |
बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले .......... काल रात्री ||
जळावर आरुढलेली, जमीन सोडलेली माती |
खिडकीबाहेर पडलेली सर्दून विझलेली पणती |
कठड्यावर उगवलेली काही आगंतुक गवताची पाती |
पाहिलेस कसे सारे सारे वाहून गेले .......... काल रात्री ||
या घराचे जीर्ण गळके छत |
पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत |
त्या पणतीची पोरकी झालेली वात |
समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री ||
खूप आतून जाणवले सखे तुझ्या असण्याचे महत्व |
मी मात्र उगाच मिरवत होतो प्राक्तनावरचे स्वामित्व |
शेवटी विरघळलेल्या वातीत जाणवतेच ना कापसाचे अस्तित्व |
हेच ते हेच.... जे मला सारे सारे कळून गेले .......... काल रात्री ||
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२७/०४/२०११)
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
या घराचे जीर्ण गळके छत
या घराचे जीर्ण गळके छत |
पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत |
त्या पणतीची पोरकी झालेली वात |
समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री ||
छान आणि मत लिहिलेय !!
खुप आवडली कविता .. पाउस आनि
खुप आवडली कविता .. पाउस आनि विरहवीराची मनाची स्थीती अप्रतिम विनली आहे तुम्ही ..
शब्द न शब्द आवडला ..
वाचनखुण साठवुन ठेवली आहे ..
छान लिहिले आहे .
छान लिहिले आहे .
स्तुत्य..
स्तुत्य..
एवढेच म्हणतो.
स्तुत्य..
स्तुत्य..
एवढेच म्हणतो.
वा
वा चांगली जमली आहे ही कविता. मुक्त म्हणायचा का छंदही?
पण ते टिंब कमी करण्याचे मनावर घ्या बॉ जरा. 'म्हण्जे ...........रात्री' ऐवजी विदाउट टिंब 'रात्री' पण चालेल.
अहो
In reply to वा by निनाद
अहो, ती टिंब एवढ्याकरता आहेत की कविता वाचतांना त्याठिकाणी मला एक छोटा पॉज अपेक्षीत आहे.
विराम
In reply to अहो by मिसळलेला काव्यप्रेमी
पॉज म्हणजे विराम, म्हणजे तुम्हाला स्वल्पविराम अपेक्षित आहेत का?
वाचण्याचा पॉज वाचकाला ठरवू देत असे मला वाटते!
टिंबांचा वापर म्हणजे नवकवी असल्याची लक्षणे मी मानतो.
तुम्ही तर जुने कवी आहात, म्हणून म्हणतो;
का वाचकांचा वेळ मोडा
आता टिंबे सोडा|
सुटे थांबण्याचा तिढा
विरामचिन्हे जोडा||
चांगली कविता..!
चांगली कविता..!
कविता आवडली.
कविता आवडली.
आवडली.
आवडली.
एकदम मस्त आहे
एकदम मस्त आहे
ओये मिका... खासच!! वेड...
ओये मिका... खासच!! वेड...
छान...
छान...
आमा तुम तो बडे गजब के शायर निकले..
कालच्या रात्रीची का ? ही तर रोजच्या रात्रीची कविता आहे. आवडली.
पण लाल मेंदी दिवसेंदिवस गडद काळी का होते आहे ?
छान कविता!
छान कविता!
छान रे गझल वाटतेय का ही.
छान रे
गझल वाटतेय का ही.
हेच
In reply to छान रे गझल वाटतेय का ही. by मुलूखावेगळी
कविता नव्हे, ही गझल; सांगा मिकाला
पण तो नाही म्हणतो, गझल करायला |
जमत नाही म्हणे नाट्य आणायला
नि शब्दांच्या मालगाड्या पाठवायला ||
;)
एवढं सगळं कसं सुचतं राव
एवढं सगळं कसं सुचतं राव तुम्हाला???
लय भारी!!!
सर्व
सर्वांना धन्यु :)