Skip to main content

वासंतिका‏

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 20/04/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वागता पुन:र्मिलनाच्या उत्तरा अन रविच्या घेऊन बहार साचा आला वसंत आला || विरह तो सहा मासांचा तिज शुष्क थंड शिशिराचा गर्भात फुलवीत आशा पुन:रुपी वसंत आला || रंगेल सोहळा आता विरहीत दोन जीवांचा उभारीत गुढ्या पर्णांच्या विलासी वसंत आला || लेऊन गर्द हिरवाई कोरून पुष्प काशिदाही रसरशीत फळे ही पदरी मिलनास अधिर अवनी ही || आला वसंत आला .......... __/\__ अपर्णा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2954
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कविता छानच .. आवडली .. तुमची 'आलेख' हि कविता जास्त आवडली होती... ही सुद्धा कविता तशीच, नाविन्य.. पुन्हा फिरुन येणारी पालवी मस्तच... विशेष करुन गर्भात फुलवीत आशा आणि पर्णांच्या गुढ्या उभारुन ह्या ओळी खरेच खुप मस्त वाटल्या .. पर्णांच्या गुढ्या काय मस्त कलप्ना आहे नाहि ...? असेच लिहित रहा .. वाचत आहे

मस्तच.. आवडेश.. अवांतरः च.गो. यांची चारोळी आठवली. पाने गळताना सांगतात वसंत आता येणार आहे वसंत ओरडतच येतो की मी लगेच जाणार आहे. :)

सुंदर!

वा !!