वासंतिका
स्वागता पुन:र्मिलनाच्या
उत्तरा अन रविच्या
घेऊन बहार साचा
आला वसंत आला ||
विरह तो सहा मासांचा
तिज शुष्क थंड शिशिराचा
गर्भात फुलवीत आशा
पुन:रुपी वसंत आला ||
रंगेल सोहळा आता
विरहीत दोन जीवांचा
उभारीत गुढ्या पर्णांच्या
विलासी वसंत आला ||
लेऊन गर्द हिरवाई
कोरून पुष्प काशिदाही
रसरशीत फळे ही पदरी
मिलनास अधिर अवनी ही ||
आला वसंत आला ..........
__/\__
अपर्णा
कविता छानच .. आवडली ..
सुरेख!
सुंदरच. मस्त ... लय आणिक शब्द
सुरेख!
मस्तच.. आवडेश.. अवांतरः
अप्रतिम ममो!
सुंदर!
वा !!
मस्त आहे कविता.
मस्त..!
धन्यवाद तात्या, जागु, सुहास,
वसंताचे रंग घेवून तुमची कविता