Skip to main content

श्वास श्वासात...

लेखक गणेशा यांनी सोमवार, 28/03/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास श्वासात... कोण कोणात... जीवनाची धावाधाव !! भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी अंतरीचा नाद... ह्रदयाची साद... घे आयुष्याची गिरकी !! -- शब्दमेघ
लेखनविषय:

वाचने 2598
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

गणेशा -खूपच छान नि छान रचना भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी

छान

मस्त आहे कविता !दोनदा वाचली तेव्हा लक्षात आली पण फायदाच झाला त्यामुळे :)

मला बहीणाबाई चौधरी यांची कवीता आठवली, " आला सास(श्वास्),गेला सास, नाही सरलं रे जीनं, आरं जगण-मरण, एका सासा च अतंर"

नाद ब्रम्हाचा... अंत जीवनाचा... फ़क्त शरीरत्याग !! हे नाही पटले! बाकी छान!! :) राघव

In reply to by राघव

@ राघव अपेक्षित बदल केला आहे , कडव्यातील शब्द बदलता आले नाही.. पण त्या कडव्याशीवाय ही मुळ अर्थ तसाच राहिल्या कारणाने ते कडवे काढले आहे. धन्यवाद .. @ ऑल सर्वांचे मनापासुन धन्यवाद ...

In reply to by स्पंदना

प्रथमता सर्वांचे आभार .. @ अपर्णा जी... राग का हो येईन बरे ... तुम्ही आपले पणाअने योग्य सांगितले त्यातच आनंद आहे ... योग्य बदल केला आहे..

म्हराज, तुम्हास्नी __/\__
घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी
हिथ फिदा बरका...