नियतीने कोरले जे असे
चेहऱ्यावरती तसे ते ठसे
नित्य मुखवटे तेच खुपावे
बंध किती हे सहन करावे?
नाव जसे मिळविले कर्माने
निष्कलंक नी अबाध्य जपणे
जपती सगळे प्राणपणाने
झुकतो आत्मा ह्या ताणाने
मुक्त श्वास घेण्या तापातून
उपाय असती फ़ार पुरातन
नाट्य, तमाशा, किंवा लेखन
प्रदान करीती अलगच दर्शन
कोणी जाती हास्यगृहांतरी
टिंगू अथवा लंबू दिसे जरी
हसूनी स्वत:ला खरे पोटभरी
मुखवट्याची बोच नष्ट करी
जाल जादुई बघा उभरले
चेहरा पुस्तक तेथ उमटले
ब्लॉग विविध आयडींने केले
समाज दर्पण जणू उभरले
महाजाल बघ विणले घट्ट
का करिशी स्वत्वाचा हट्ट?
धरी आयडी नाना कळा
घेई श्वास बेबंद मोकळा
संस्थळींचे जादुई दर्पण
तणाव-नाशक मुक्त वर्तन
दिसुही शके ना स्वत: जसे
रूप दर्पणी भिन्न दिसावे
वाचने
2427
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे.
मस्त....................खुप
झकास आणि सकस /सरस
कविता आवडली.
खरी आयडी
+१
In reply to खरी आयडी by प्रकाश घाटपांडे
मस्त ......आवडली कविता
तुमचा दुसरा आयडी नक्की
आय एम ऑनर्ड!
In reply to तुमचा दुसरा आयडी नक्की by टारझन
प्रकाटाआ.
वावा!! आवडले.
अरुण मनोहर - छान .आवडली
छान कविता!
अच्छा ! ही पुर्ण कविता आहे
डु-आयडी मंजे काय ? डु-आयडी